Friday, February 22, 2019
बिगुल
Advertisement
  • मुख्यपान
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कला-साहित्य
  • समाज
  • अर्थ
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • करिअर
  • मीडिया
  • दिवाळी अंक
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कला-साहित्य
  • समाज
  • अर्थ
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • करिअर
  • मीडिया
  • दिवाळी अंक
No Result
View All Result
बिगुल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कृषी सन्मान योजनेचा राज्यात ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ

टिम बिगुल by टिम बिगुल
February 7, 2019
in महाराष्ट्र
0
कृषी सन्मान योजनेचा राज्यात ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ
2
SHARES
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ७२०० कोटी  रुपये जमा होणार असून, योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ही योजना राज्यात राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गरजू शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

सन २०१५-१६ मध्ये झालेल्या कृषि गणनेनुसार राज्यात १ कोटी ५२ लाख ८५ हजार ४३९शेतकरी आहेत. कोकण विभागात १४ लाख ८६ हजार १४४ शेतकरी आहेत त्यापैकी अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी संख्या ८४.५० टक्के एवढी आहे. नाशिक विभागात २६ लाख ९४ हजार ४८१ शेतकरी असून त्यापैकी ७८ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. पुणे विभागात ७३ लाख २३ हजार ६७३ पैकी ८४टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. औरंगाबाद विभागात ३९ लाख ५३ हजार ४०० शेतकऱ्यांपैकी ७९.५० टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. अमरावती विभागात एकूण शेतकऱ्यांची संख्या १९ लाख १३ हजार २५८ असून ७३ टक्के अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी असून नागपूर विभागातील १५ लाख १४ हजार ४८३ शेतकऱ्यांपैकी ७६ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक गटातील आहेत.

ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी आणि त्यांच्या १८ वर्षांखालील अपत्यांचा समावेश) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकुण कमाल धारणक्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल अशा कुटुंबाना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्याचा  तसेच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कृषि विभागाने नोडल विभाग म्हणून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

संवैधानिक पद धारण करणारे/केलेले आजी व माजी व्यक्ती, आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य, आजी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी/कर्मचारी (चतुर्थश्रेणी/गड-ड वर्गातील कर्मचारी वगळून), मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊटंट), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट), इ. क्षेत्रातील व्यक्ती यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्रतेचे निकष केंद्र शासनाने निश्चित केले आहेत.

एखाद्या संयुक्त कुटुंबामध्ये चार किंवा पाच उपकुटुंब असतील आणि त्यातील प्रत्येकाच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असेल तर त्या उपकुटुंब प्रमुखालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून, ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येतील.

राज्यात अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ८० टक्के म्हणजे जवळपास एक कोटी २० लाख एवढी असून, त्यातील निकषास पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत वर्षभरात ७२०० कोटी रुपये मिळणार आहेत. गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

Tags: FarmermaharashtraMaharashtra GovernmentModi governmentPM Narendra Modiताजेमहाराष्ट्र
टिम बिगुल

टिम बिगुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिवाळीअंक

कथा घसरत्या कार्यमूल्याची
दिवाळी अंक

कथा घसरत्या कार्यमूल्याची

by अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर
November 9, 2018
0

कार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...

असगर वजाहत यांच्या कथा

असगर वजाहत यांच्या कथा

November 9, 2018
महिनों अब मुलाकाते नही होती…

कविता… कविता…

November 9, 2018
दुसरी बाजू

दुसरी बाजू

November 9, 2018
न्यूज जॉकीचा पुनर्जन्म

टिमलखलख ते टिमलखलख

November 9, 2018
कृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह

कृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह

November 9, 2018
इस्लाम आणि बहुपत्नीत्व

न्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार?

November 9, 2018
रडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण

रडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण

November 9, 2018
नाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…

नाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…

November 9, 2018
प्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी

प्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी

November 9, 2018

आमची शिफारस

Nandu Gurav writes blog about Congress party situation in Sangli district

सांगलीच्या बालेकिल्ल्याची वाताहत काँग्रेस कशी रोखणार?

by टिम बिगुल
February 21, 2019
0

नंदू गुरव, सांगली सांगली : शत्रूशी लढ लढ लढून पूर्वजांनी एखादा किल्ला काबीज करावा, त्यावर बसून वाचक बसेल असा कारभार...

priyadarshan writes about Literary namvar singh

नामवर सिंह : प्राणवायू देणारा वृक्ष

by प्रियदर्शन
February 21, 2019
1

गेले वर्षभर हिंदी साहित्याच्या आकाशात मृत्यू घिरट्या घालतोय जणू. गेल्यावर्षी १९ मार्चला केदारनाथ सिंह यांच्यापासून आज १९ फेब्रुवारीपर्यंत नामवर सिंह...

megha pansare writes blog about four years after govind pansare death

आता ठरवा, तुम्ही कोणत्या बाजूला आहात!

by टिम बिगुल
February 20, 2019
0

मेघा पानसरे२० फेब्रुवारी २०१९. कॉम्रेड पानसरेंना जाऊन चार वर्षे उलटली. अजूनही ती सकाळ, हिंसेचा प्रत्यक्ष थरार जसाच्या तसा आठवतो. घरासमोरच...

congress challenges shiv sena bjp by asking 10 questions

युतीला काँग्रेस पक्षाचे दहा प्रश्न

by टिम बिगुल
February 19, 2019
0

मुंबई : भाजप शिवसेना अभद्र युतीच्या पार्श्वभूमीवरती अफझल खानाशी युती करणा-याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला...

सर्वात लोकप्रिय

  • Shripad brahme writes review of marathi movie anandi gopal

    केवळ नतमस्तक…!

    152 shares
    Share 152 Tweet 0
  • नामवर सिंह : प्राणवायू देणारा वृक्ष

    1 shares
    Share 1 Tweet 0
बिगुल

© 2018 बिगुल
Developed by UI10.COM

संपर्क साधा

  • संपर्क

सोशल मिडीया

No Result
View All Result
  • Home

© 2018 बिगुल
Developed by UI10.COM