कला-साहित्य

सलीम, जंगल आणि साहित्य अकादमी

महेंद्र कदम  कोल्हापूरच्या वास्तव्यात मला भेटलेला हा माझा मित्र. सलीम मुल्ला त्याचं नाव. कधीतरी अचानक भेट झाली आणि मित्र बनून गेला. त्याची वनविभागात नोकरी करण्याची धडपड   पाहून मी अचंबित झालो होतो. मूळचा आर्किटेक्ट इंजिनिअर. बऱ्यापैकी साईट्स असलेला. मिळकत उत्तम होती, तरी  त्याला का असले भिकेचे डोहाळे लागलेत कळायचे नाही. जंगलाच्या ओढीने तो वेडा झाला होता. त्या वेडातच चक्क वन खात्यात नोकरी लागला आणि मूळ व्यवसायाला फाट्यावर मारीत कोकणात रुजू झाला. मग तो झाडापानांशी, पक्षीप्राण्यांशी, मातीशी  आणि स्वतःशी मनसोक्त बोलत आला. त्यापायी घरादाराकडे कायम दुर्लक्ष करत गेला. पण भाभीनी त्याच्या  वेडेपणाला साथ दिली. त्याचा मूड सांभाळला. त्याला अक्षरशः लहान मुलासारखा  जपला देखील. त्यातून तो अधिकच जंगलात रमत गेला. त्याला हवा असलेला अवकाश त्याला मिळाला. तो लिहू लागला. कॅमेऱ्याने  जंगल आणि त्याच्या हालचाली टिपू लागला. त्याचा कॅमेरा  तर इतका बोलतो कीं, बस्स!! गळ्यात घेऊनच तो फिरत असतो. एकवेळ भाभीला विसरेल पण कॅमेरा नाही विसरणार. तो मग जंगलाशी बोलता बोलता लिहू लागला. इकडे तिंकडे कुठे कुठे त्याचे वाचीत होतो. त्याच्या वाचनातून मला मारुती चितमपल्लींची आठवण होत होती. पण या त्याच्या प्रेमात  इथली सडलेली व्यवस्था व्यत्यय आणीत होती. जंगलं साफ होताना आणि निसर्गधन संपताना पाहून, त्याचा जीव तीळ...

Read more

गिरीश कार्नाड नामक विरोधाचे व्याकरण

गिरीश कार्नाड यांची शेवटची काही मार्मिक छायाचित्रे सभांमधून घेतलेली होती, ज्यात ते कधी ‘मी सुद्धा अर्बन नक्षली’ तर कधी ‘नॉट...

Read more

कोण होते संगीतसम्राट तानसेन ?

संगीतसम्राट तानसेन यांचे हे पाचशेवे जन्मवर्षं सुरू आहे. त्यांच्या जन्म व मृत्यूच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत. पण ते १५२० साली...

Read more

दारिद्र्याची शोधयात्रा

एस एम जोशी फाउंडेशन च्या वतीने अर्थतज्ञ गंगाधर गाडगीळ यांच्या स्मरणार्थ ‘ दारिद्र्याची शोधयात्रा’ या अहवालावर एस एम फाऊडेशन येथे...

Read more

‘सिंहासन’ ४० वर्षांनंतर!

खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेले दाढीचे खुंट अन् मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात...

Read more

पुरंदरेलिखित खोट्या इतिहासाची झाडाझडती

आपल्या वैचारिक अनुयायांना उपदेश करताना तथागत गोतम बुध्द यांनी स्पष्टपणे असे म्हटले आहे की, 'एखादी गोष्ट अनुश्रवावरुन म्हणजे ऐकीव माहितीवरून...

Read more

कोल्हापूरच्या कलावंतांचे दिल्लीत चित्रप्रदर्शन

नवी दिल्ली : कोल्हापूर येथील दळवीज् आर्ट इस्टिट्यूटमधील जेडी आर्ट शाखेच्या अंतिम वर्षाच्या सात तरूण कलाकारांनी देशाच्या राजधानीत ‘संक्रमण’ हे...

Read more

जावेद….साहिर आणि दोनशे रुपये !

ख्यातनाम शायर जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातील हा संस्मरणीय प्रसंग... जावेद अख्तर यांच्यासाठी तो खडतर काळ होता....

Read more

स्वातंत्र्य, विविधता धोक्यात

यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा...

Read more
Page 1 of 3 1 2 3

दिवाळीअंक

आमची शिफारस

वाळ्याची शाळा

वाळ्याची शाळा

महाराष्ट्राचे माजी मंत्री बी.जे.खताळ पाटील यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी 'वाळ्याची शाळा' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातील त्यांचे मनोगत....

किल्ल्यांवरच्या प्रत्येक दगडाला इतिहास

किल्ल्यांवरच्या प्रत्येक दगडाला इतिहास

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बाजारीकरणाला माझा विरोध अनाठायी आहे, आक्रस्ताळी आहे, असा आरोप सध्या माझ्यावर केला जातो आहे. इतिहासाच्या बाजारीकरणाला, संस्कृतीच्या बाजारीकरणाला...

पक्ष बदलास कारण की…

पक्ष बदलास कारण की…

ज्ञानेश महाराव सोलापुरातील भाजपच्या ‘महाजनादेश यात्रा’च्या समारोप सभेत* भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘भाजपने पूर्णपणे दरवाजे...