धास्ती आणिबाणीची…!
जेव्हा राष्ट्राला उद्देशून संदेश होणार ही बातमी ऐकली त्यावेळीच मनात शंकेची पाल चुकचुकली. बायकोची गळाभेट घेतली. एक झप्पी पण दिली. मुलं शाळेत असल्यानं त्यांना घरी आल्यावर बाबा गावी गेले, असं सांग म्हणालो. खिडकीतून खाली रस्त्यावर दारात, चौकात पोलिस आहेत का याचा अंदाज घेतला. एकावर एक तीन चार बनियन व तेवढेच शर्ट घातले. घरातल्या सर्व आवश्यक कागदपत्रावर सह्या केल्या. बायकोच्या खात्यावर होती तेवढ्या रकमेचा चेक लिहून ठेवला. आणिबाणी लादली तर पहिली अटक होणार हे बायकोला सांगितलं, तशी ती घाबरली. माझा मित्र अम्या, अलोक, आशिष यांचीही काळजी वाटू लागली. घरचंसगळं आटोपून भाषण सुरू झाले की ते संपायच्या आतं परागंदा व्हायचं ठरवलं. अम्याला फोन लावायला घेतला. तेवढ्यात भाषण सुरू झालं. मग फोन सोडून पायात स्पोर्ट शूज चढवू लागलो. (पळायला त्रास नको म्हणून स्पोर्ट शूज ) तेवढ्यात प्रधानसेवकांनी अंतरिक्षात भारतानं केलेली कमाल सांगायला सुरूवात केली. बुटाची लेस घट्ट बांधायची थांबवली.. नवीनचं काहीतरी असल्याची जाणिव झाली. हुश: हुश: करत पहिली अंगातली कापडं काढली अन बसलो बघत…महाशक्तीचे कौतुक. नेहरूंची आठवण झाली. नेहरूंनी इस्रो, डीआरडीओ ची स्थापनाकेली नसती तर हा सुवर्ण क्षणाचा साक्षिदार होता आलं नसतं. मनात चुकचुकलेली पाल पळून गेली. लोकशाही तुर्तास तरी टिकल्याचे पटले अन कामाला लागलो पुन्हा. जय हो…!!!
संजय मिस्कीन
आणखी वाचा : खोट्याच्या कपाळी खऱ्याचा गोटा
भाजप सरकारमुळे पत्रकारांमध्ये अतिउच्च रक्तदाब आणि हायपर टेन्शनच प्रमाण वाढलं! कसं ते असं. कधी काय करतील सांगता येत नाही. घोषणा कशाची करतील ते ही सांगता येत नाही. कधी काहीही न करता कोणती घोषणा करतील हे ही सांगता येत नाही! आणि जे करतील त्याचा फायदा काय हे ही सांगता येत नाही!
रश्मी पुराणिक
००००००००००००००
विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात भारतीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांनी गाठलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचा भारतीय नागरिकांना सार्थ अभिमान असतो आणि असलाच पाहिजे. याचे श्रेय स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सर्व सरकारांचे आहे. पण, सर्वाधिक श्रेय ज्यांनी या क्षेत्रातील प्रगतीची आखणी प्रारंभापासून केली त्या द्रष्ट्या नेतृत्वाचे आहे. त्यांचे नाव नेहरु असे होते. आजच्याही सरकारला श्रेय दिले पाहिजे की काही परंपराबाज उकरुन काढून किंवा घोळ घालून या क्षेत्रातील प्रगतीला त्यांनी रोखलं नाही, नाउमेद केलं नाही. पाठिंबा व प्रोत्साहन देण्याचा पूर्वसूरींचा परिपाठ चालूच ठेवला. ही देशाची प्रगती आहे व सर्वांना तिचा अभिमान वाटतो, सर्वांचा त्यात सहभाग आहे,प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांचा अधिक सहभाग आहे. मात्र याहून अभिमानाची गोष्ट दुसरी नाही ही, भलतीच अतिशयोक्ती होय. इथले दारिद्य्र, इथली बेरोजगारी, इथले दंगेधोपे, एकत्वाच्या वृत्तीचा सातत्याने आविष्कार न दिसणे, अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यातील यश याहून अभिमानाचे ठरेल. सर्व सरकारेच नव्हे तर सर्व जनता त्यासाठी एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेने कार्यरत झाली पाहिजे. माझा देश-माझे यश हे खरे पण काही क्षेत्रातील अपयशाचा वाटाही तितकाच आपणा सर्वांचा आहे. ज्यात त्यात कसलं निवडणुकीचं राजकारण!
अनंत घोटगाळकर
आणखी वाचा : मासिक पाळी : अज्ञानातून अंधाराकडे
ज्या क्षेपणास्त्राने आज अवकाशातील एक कालबाह्य, निरुपयोगी उपग्रह पाडला. पण, या तंत्रज्ञानाची पायाभरणी डॉ. मनमोहन सिंग यांच्याच काळात झाली होती व ते तंत्रज्ञान आपण २०१२ सालीच आत्मसात केलं होतं. आज जे बुडबुडे काढले ते, ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असेच आहेत. काय आहे माणसांची स्मरणशक्ती क्षणिक असते. पण, काही लोकं लेखी पुरावे ठेऊन जातात. या जगात बोलणाऱ्यांची आंबट द्राक्ष विकली जातात आणि अबोल व्यक्तीची गोड द्राक्ष विकली जात नाहीत. मार्केटिंग चा जमाना आहे. असो. यांनी गटर गँस, मंत्रशक्ती किंवा तोंडाच्या वाफेवर जर काही असं केलं असतं तर, मात्र मनापासून फेकूचाचांच अभिनंदन केलं असतं. आजच्या या यशाचे खरे हक्कदार या उपक्रमात सहभागी असलेले शास्त्रज्ञ आणि देशात विज्ञानाची मुहुर्तमेढ रोवणारे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरुजी, डॉ. होमी भाभा, डॉ. विक्रम साराभाई, डॉ. अब्दुल कलाम साहेब. त्यामुळे या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. मतदार हो, आता २३ मे २०१९ रोजी असाच एक निरूपयोगी सेवक पाडू यात. कशी वाटली #आयडीयाची_कल्पना!
अनिल घिगे
००००००००००००००
आज हे नक्की झालं की, शेठजींना किमान ३०० किलोमीटर उंच फेकता येतं! असो! डॉ. साराभाईंना आणि पं. नेहरुंना वंदन!
कौस्तुभ खांडेकर
आणखी वाचा : सांगली : राजकारण गेलं चुलीत…पाणी पेटलं
दरवेळी सुतकी चेहरे घेऊन. यात मोदींचे काय कौतुक? हे तर सेनेचे यश. हा तर वैज्ञानिकांचा गौरव (तो तर आहेच…अगदी निःसंकोचपणे) असे म्हणून मोदींच्या निर्णयक्षम नेतृत्वाला नाकारणाऱ्या जमातीसाठीखाली एक बातमीची लिंक देतोय. २०१२ सालीच, ‘अग्नी-5’ या क्षेपणास्त्राच्या सफल परीक्षणावेळी, आपल्या प्रतिभासंपन्न शास्त्रज्ञांनी (डीआरडीओ चीफ व्ही. के. सारस्वत) ‘भारत आताअँटी सॅटेलाईट मिसाईल टेक्नॉलॉजी लॉन्च करू शकतो, त्यासाठीचे पुरेसे तंत्रज्ञान व क्षमता आपल्याकडे आहे. पण, सरकारने यास मंजुरी दिलेली नाही’ असे स्पष्टपणे सांगितले होते. याची ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. ती मंजुरी देण्याचा निर्णय घेऊ शकणारे जे खंबीर नेतृत्वदेशाला लागते तेच २०१४ सालापर्यंत देशाकडे नव्हते. शूरवीर भारतीय सेना काय किंवा आपले प्रतिभासंपन्न वैज्ञानिक काय.. हे तर नेहमीच देशासाठी अहोरात्र झटत असतात पण त्यांच्या शौर्याला, प्रतिभेलान्याय मिळवून देणारे, गौरव प्राप्त करून देणारे व त्याद्वारे देशाला महाशक्ती म्हणून ओळख मिळवून देणारे निर्णय ‘सर्जिकल स्ट्राईक्स-१ व २’ किंवाआजचा ‘मिशन शक्ती-अँटी सॅटेलाईट मिसाईल लॉन्च प्रोग्राम’ द्वारे घेतले ते केवळ मोदीजींसारख्या खमक्या सेवकाने. आजचा दिवस २७ मार्च २०१९ हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. कुठल्याही अणूचाचणी पेक्षा कमी ही घटना नाही. शत्रू राष्ट्राचेसॅटेलाईट पडण्याची क्षमता तुमच्यात आली तर तुम्ही युद्धजन्य परिस्थितीत मैदानाबाहेर अंतराळात त्या शत्रूच्या सॅटेलाईटला पाडून त्याच्या अंतर्गतव्यवस्थेचे पार कंबरडे मोडू शकता. हा भीम पराक्रम करू शकणारे आता केवळ चार देश आहे व त्यात एक आपला भारत आहे. हे लिहितांना व वाचतांनासुध्दा अभिमानाने अंगावर शहारे येतात. म्हणूनच ‘मोदी है तो मुमकीन है’ असे अभिमानाने म्हणत खाली दिलेली लिंक त्या सर्व सुतकी मूळव्याधग्रस्त जमातीच्या तोंडावर अभिमानाने फेकूनमारा.
अजिंक्य उजलंबकर
डीआरडीओचे हार्दिक अभिनंदन. देशाला तुमचा अभिमान आहे.
अशा इस्रो, डीआरडीओसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची उभारणी करणारे पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांना नावलौकिक मिळवून देणारे विक्रम साराभाई, सतीश धवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि अनेक शास्त्रज्ञ यांचे कृतज्ञ स्मरण.
प्रकाश कुलकर्णी
००००००००००००००
उगाच मोदीने अंतरीक्ष मिशन शक्तीच श्रेय घेऊ नये, कर्णचा जन्म स्टेमसेल टेक्नॉलॉजीनी झाला. गणपतीला हत्तीचं तोंड प्लास्टिक सर्जरीन बसवण्यात आलं असल्या भंपक गावगप्पा वैज्ञानिकांसमोर सांगणाऱ्या मोदींची लायकी नाहीये अंतरीक्ष या विषयाच क्रेडिट घेण्याची. RSS वाल्यांचं तंत्रज्ञान गाईच्या मुता पर्यंतच सीमित आहे व राहील.
प्रशांत गायकवाड
००००००००००००००
आजचे निवेदन :
पहिली गोष्ट. डीआरडीओ नेहरूंनी स्थापन केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट अवकाशात असलेले सॅटेलाईट्स टार्गेट करण्याची आणि त्यांना उडवण्याची क्षमता भारताने २०१२ सालीच मिळवली आहे. निवेदन संपले.
टीप : शेठने आणि त्याच्या भक्ताडांनी नीट अभ्यास करून यावे. तुमचा अभ्यास कच्चा असला तरी आमचा नाही.
तळटीप : पुरावे मागितले तरी चालतील आम्ही काही तुम्हाला देशद्रोही म्हणणार नाही (इथे पण आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत.)
हेमा संखे
००००००००००००००
“गेल्या सत्तर वर्षांत खाली काहीही न घेता उपग्रह पाडायला परवानगी देणारा एकमेव पंतप्रधान”
शच्चिदानंदवडेजी
००००००००००००००
“तो उपग्रह वक्री गेल्याने त्याची शांती करणे गरजेचे होते त्यासाठी हे पाऊल ऊचलणे भाग पडले.”
जोतिषाचार्य येदुर्प्प्पा
००००००००००००००
“पापस्तान पुरस्कृत दहशतवाद आता अंतरिक्षमध्ये जाऊ शकणार नाही, पापस्थानची अंतरीक्ष नाकेबंदी करून नमोजींनी मास्टरस्ट्रोक लगवला आहे”
ताऊ भोर्सेकर
००००००००००००००
“आता पिशी मावशीसहीत समस्त फुरोगामी लोकांचे मोबाईल आणि पिसी यावर उपग्रहाद्वारा बारीक लक्ष ठेऊन शहरी नखसलवाद पूर्णपणे संपवण्यासाठीचे ५६ इन्ची पाऊल”
वैदाली शेफ
००००००००००००००
“अंतरीक्षीय राजकारण आणि तिथल्या अर्थकारण यावर आता भारताची मजबूत पकड निर्माण होणार असून तिथली अर्थव्यवस्था आता पूर्णपणे हिंदुत्ववादी होण्यास मदत होणार आहे.”
पिझ्झा बॉय
००००००००००००००
“अंतराळात माजलेला भ्रष्टाचार आणि अनगोंदी संपवून तिथं लोकशाही स्थापन करण्यासाठी जे धाडस लागतं ते आज नमोजींनी दाखवलं आहे.”
धविनाश अर्माधिकारी
००००००००००००००
“या अं अं अं एका मोठ्या अं अं अं तंत्रज्ञानामुळे अं अं अं एब्पी माजाला नि:पक्षपाती प्रक्षेपण करण्यास अं अं अं मदत होईल”
प्रसन्ना खांदेकर
००००००००००००००
“या तंत्रज्ञानामुळे अंतराळात कोण कुठल्या फोटोमुळे कधी व कुठे आणि कसे उद्युक्त होते हे शोधणे सोपे होणार आहे.” गौरभ सर
सुहास नाडगौडा
००००००००००००००
वैधानिक इशारा – हलकेच घ्या! टाईट झालेले वातावरण शांत झाल्यावर कानावर पडलेला संवाद. “त्या दोन हजारांच्या नोटेतली चिप डिटेक्ट करणारा सॅटेलाईट फोडला…”
प्रतीक शिवाजीराव पाटील (Courtesy whatsapp)