Monday, December 16, 2019
बिगुल
Advertisement
  • मुख्यपान
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कला-साहित्य
  • समाज
  • अर्थ
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • करिअर
  • मीडिया
  • दिवाळी अंक
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कला-साहित्य
  • समाज
  • अर्थ
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • करिअर
  • मीडिया
  • दिवाळी अंक
No Result
View All Result
बिगुल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या?

श्रीमंत कोकाटे by श्रीमंत कोकाटे
May 9, 2019
in महाराष्ट्र
2
shrimant kokate writes about tukaram maharaj and his death

Tukaram Maharaj

0
SHARES
Share on FacebookShare on Twitter

संत तुकाराम महाराज यांच्या मृत्यूबद्धल दोन मतप्रवाह आहेत.पहिला आहे ते विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले आणि दुसरा आहे त्यांची हत्या केली. संत तुकाराम महाराज यांचा जन्म १६०८ चा तर मृत्यू १६५० सालचा म्हणजे ते फक्त ४२ वर्षे जगले. ते वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्यू पावले. हे वय मृत्यूचे नाही. संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा, वादाचा विषय राहिला आहे. संत तुकाराम महाराजांचा मृत्यू कसा झाला हे समजून घेण्यासाठी त्यांचा संघर्ष समजून घ्यावा लागेल. ते अत्यंत बुद्धिमान, प्रेमळ आणि श्रीमंत होते. त्यांनी सुमारे पाच हजार अभंग लिहिले. त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले. संत तुकाराम महाराजांचा लढा विषमतेविरुद्ध होता. ते म्हणतात 

        भेदाभेद भ्रम अमंगल।

        सर्वांची एकची वीण।

         तेथे कैसे भिन्नाभिन्न।

संत तुकाराम महाराजानी विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला.वर्णव्यवस्थेवर हल्ला करताना संत तुकाराम महाराज म्हणतात

             वर्णाअभिमाणे। 

        कोण झाले पावन।

            ऐसें द्या सांगून।

                 मजलागी।

संत तुकाराम महाराजानी वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला केला. त्यामुळे जे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते ते तुकाराम महाराजावर प्रचंड चिडले. संत तुकाराम महाराजानी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला.

      नवसे कन्यापुत्र होती।

   मग का करणे लागे पती।

नवस सायास करू नका, प्रयत्नानेच यश मिळेल.

      असाध्य ते साध्य।

        करिता सायास।

      कारण अभ्यास।

            तुका म्हणे।

प्रयत्नवादी व्हा, दैवावर विश्वास ठेवू नका, हा संदेश संत तुकाराम महाराजानी दिला. ब्राह्मणाचा व आपला धर्म एक नाही. त्यामुळे त्यांचा संबंध तोडा,त्यांच्याकडून कोणतेही विधी करू नका, असा मोलाचा उपदेश संत तुकाराम महाराजानी केला. ब्राह्मणांच्या वर्चस्वातून समाज मुक्त व्हावा या हेतूने संत तुकारामांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला.

          ऐसें कैसे झाले भोंदू।

    कर्म करुनि म्हणती साधू।

            अंगा लावुनि राख।

  डोळे झाकुनि करिती पाप।

        दावी वैराग्याची कळा।

    भोगी विषयांचा सोहळा।

      तुका म्हणे सांगो किती।

         जळो तयांची संगती।

भटाब्राह्मणांची संगत सोडा हे संत तुकाराम महाराजानी निक्षून सांगितले. त्यांनी यज्ञ, होम, हवन, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, दशक्रिय, पुरोहितगिरी, पंचांग, भविष्य याविरुद्ध मोहीमच उघडली. त्यामुळे ब्राह्मण संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या अभंगांची गाथा ब्राह्मणांनी इंद्रायणीत बुडवली. ते पदोपदी संत तुकाराम महाराजाना त्रास देऊ लागले आणि यातच संत तुकाराम महाराज नाहीसे झाले. ब्राह्मणी पक्षाच्या मतानुसार ते वैकुंठाला गेले, तर संस्कृतपंडित डॉ. आ. ह. साळुंखे आणि सुदाम सावरकर यांच्या मतानुसार त्यांचा घातपात झालेला आहे. दोन्ही पक्षाचे मत पाहण्यापूर्वी संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ, स्वर्ग याबाबत काय मत होते. ते आपण पाहू. संत तुकाराम महाराज हे जीवनाला कंटाळलेले नव्हते. ते जगू आणि लढू इच्छिणारे हिम्मतवान आणि क्रांतीकारक संत होते. ते म्हणतात…

     बुडता हे जन न देखवे डोळा।

         येतो कळवळा म्हणोनिया।

लोकांना ब्राह्मणी गुलामगिरीतून बाहेर काढणे हे त्यांचे जीवितकार्य होते. त्यामुळे ते जबाबदारी सोडून इहलोक सोडून जाणारे नव्हते. ते उपास तापास जप जाप्य करणारे नव्हते.

               नको सेवू वन।

             नको सांडू अन्न।

अन्नत्याग करणे आणि वनांत जाणे,याला संत तुकाराम महाराजानी विरोध केला. संत तुकाराम महाराजानी स्वतः स्वर्ग, वैकुंठ, मोक्ष नाकारलेला आहे. ते म्हणतात

       येथे मिळतो दहिभात।

    वैकुंठी त्याची नाही मात।

पृथ्वीवर काबाडकष्ट केले तर दहीभात-भाजीभाकरी तर मिळेल. पण, वैकुंठात जे कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी सांगितले जातात ते धादांत खोटं आहे. ते म्हणतात

        भय नाही जन्म घेता।

       मोक्षपदा हाणो लाथा।

       तुका म्हणे आता।

     मज न लगे सायुज्यता।

संत तुकाराम महाराज म्हणतात या जन्माची मला भीती नाही, म्हणजे ते पृथ्वीवर राहू इच्छित होते. मोक्षाला लाथा घाला, असे म्हणून ते मोक्ष(वैकुंठ) नाकारतात. जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात, ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का? तथाकथित मोक्षाचे अतिउच्च पद म्हणजे सायुज्यपद आहे, असे वैदिक परंपरा सांगते, त्या सायुज्यपदाला तुकाराम महाराज नाकारतात. म्हणजे जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का?. तुकाराम महाराज म्हणजे

      बोले तैसा चाले।

     त्याची वंदावी पाऊले।

या विचारांचे जसे बोलायचे तसे वागायचे,असे होते.म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत हे त्यांच्याच अभंगावरून/विचारावरून स्पष्ट होते. मग तुकाराम महाराजांच्या वयाच्या 42 व्या इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला? संत तुकाराम महाराजांचा लढा ब्राह्मणाविरुद्ध होता. त्यांनी तुकाराम महाराजाना खूप त्रास दिला होता. तुकाराम महाराज विचाराने लढत होते. तर, ब्राह्मण त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करत होते. त्यांच्या अभंग लेखनावर बंदी घालणे, त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवणे, त्यांची बदनामी करणे, या बाबी ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांची हत्या करून ते विमानात बसून वैकुंठाला गेले, अशी अफवा पसरवली. अफवा पसरवण्यात ब्राह्मणांचा हात जगात कोणीही धरणार नाहीत.

सर्वांत महत्वाचे संत तुकाराम महाराजांनाच विमान न्यायला आले, तर मग आद्य शंकराचार्य, संत एकनाथ, रामदास यांना न्यायला विमान का आले नाही? सतराव्या शतकात वैकुंठाला नेणारे सोडा पण चंद्रावर घेऊन जाणारे तर विमान भारतात होते का? वैकुंठाला खोटं ठरवणारे संत तुकाराममहाराजच वैकुंठाला गेले, असा प्रचार करणे, ही बाबच त्यांची हत्या झाली, हे स्पष्ट करते.

आणखी महत्त्वाचे विषय :

सनातन संस्था आणि काँग्रेस

हुकूमशाहीचा धोका रोखण्यासाठीच माघार

टिम इंडिया खरंच विनिंग कॉम्बिनेशन आहे?

Tags: Indian SocietySocietyTukaramTukaram Maharaj deathTukarm Maharajताजे
श्रीमंत कोकाटे

श्रीमंत कोकाटे

Comments 2

  1. दत्ता गवळी says:
    9 months ago

    संत तुकाराम महाराजांच्या घातपाताची बातमी त्या बामनांनी छ शिवाजी महाराजांच्या कानावर पडू नये म्हणून त्यांनी लोकांना पटवून दिले की महाराज वैकुंठ ला विमानाने गेले.. एका कडून दुसऱ्या ला असे करत करत त्यांनी सर्व समाजात, स्वराज्यात ही बातमी पसरविली.. जेणेकरून कोणी त्यांच्यावर संशय व्यक्त करू नये… यासाठी त्यांनी सोयीस्कर सर्व पसरविले.. संत तुकाराम महाराजांचा देहच दिसू दिला नाही आणि त्यांची च बीज सुरू केली… त्यांच्या नावाचा जयजयकार केला कारण याबामानांवर कोणाचेच लक्ष वेधले जाऊ नये..
    जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे छ शिवरायांच्या स्वराज्याचे मार्गदर्शक होते आणि संत तुकाराम महाराजना शिवराय वंदनीय होते.. भविष्यात बामनांना डोकेदुखी ठरेल म्हणून समस्त बामनांनी डाव साधला… शिवाय संत तुकाराम महाराजांचे वंशज हि हया गोष्टी ला बळी पडले।।।

    Reply
  2. Bhavarth Choudhary says:
    3 months ago

    होते विमान रावणा जवड़ कसे होते मग ?? 🤔🤔
    संजय जवड़ जसी दूर दृष्टि होती न ,,, तशी व्यवस्था देव का करूं शकत नाही ,, चाले हे शरीर कवणाचीये सत्तेने….
    तुझीये सत्तेने वेदासी बोलने सुर्यासी चालने तुझीया बड़े…..
    बामनान्च सोड़ा पण कदाचित देवाच्या आज्ञेने तुकोबाराय जर गेले असतील तर मग 🤔🤔
    खुप बोलता येयील पण माझ मत तुमच्या भावनेला दुखवायचे नाही हो
    बर माऊली माफ करा कमेंट केल्या बद्दल 🙏🙏
    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता तुकाराम 💐💐🙏🙏

    ऋषि पंचमी , श्री गजानन महाराज पुण्यतिथि व गणेशोत्सवाच्या अमृतमय शुभेच्छा 💐💐🙏🙏

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिवाळीअंक

कथा घसरत्या कार्यमूल्याची
दिवाळी अंक

कथा घसरत्या कार्यमूल्याची

by अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर
November 9, 2018
0

कार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...

असगर वजाहत यांच्या कथा

असगर वजाहत यांच्या कथा

November 9, 2018
महिनों अब मुलाकाते नही होती…

कविता… कविता…

November 9, 2018
दुसरी बाजू

दुसरी बाजू

November 9, 2018
न्यूज जॉकीचा पुनर्जन्म

टिमलखलख ते टिमलखलख

November 9, 2018
कृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह

कृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह

November 9, 2018
इस्लाम आणि बहुपत्नीत्व

न्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार?

November 9, 2018
रडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण

रडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण

November 9, 2018
नाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…

नाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…

November 9, 2018
प्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी

प्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी

November 9, 2018

आमची शिफारस

Social Media reaction on Shivsena Bjp alliance

हे तर लोकांचे सरकार !

by टिम बिगुल
December 7, 2019
0

ज्ञानेश महाराव महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शपथ घेत असताना शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक मतदार...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची कूळकथा

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची कूळकथा

by टिम बिगुल
December 5, 2019
0

जगदीश त्र्यं. मोरे ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला...

नेहरू मॉडेलची अपरिहार्यता

नेहरू मॉडेलची अपरिहार्यता

by प्रसाद कुलकर्णी
November 13, 2019
0

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा गुरुवार ता.१४ नोव्हेम्बर २०१९ रोजी १३० वा जन्मदिन आहे.त्यानिमित्त त्यांच्या विचारधारे विषयी… थोर...

devendra fadnavis

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

by राज कुलकर्णी
November 10, 2019
0

महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित विधानसभेमध्ये भाजपा आणि सेना यांचे संख्याबळ पूर्वीपेक्षा घटले असले तरीही त्यांच्या निवडणूकपूर्व युतीला बहुमत जनतेने दिले आहे. असे...

सर्वात लोकप्रिय

    • संपर्क

    © 2018 बिगुल
    Developed by UI10.COM

    No Result
    View All Result
    • Home

    © 2018 बिगुल
    Developed by UI10.COM